सातारा प्रतिनिधी
ताण-तणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले.
सातारा: महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग आपत्ती पासून ते निवडणुका पार पाडण्याबरोबर शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे राबवित असतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण व तणाव शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असतो. ताण-तणाव कमी करण्यासाठी दररोज शारिरीक व्यायाम महत्वाचा आहे, त्या दृष्टीने या क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन सार्वजकनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले
येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे पुणे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि. 8 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.


