
मुंबई प्रतिनिधी
केंद्र सरकारने महिलांसाठी आणि मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकार मुलींना आर्थिक मदत करत असतात.सरकारमे मुलींसाठी खास बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवली आहे.
या योजनेत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण कमी व्हावे, म्हणून ही योजना राबवली आहे.
२०१५ मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या जन्माचे प्रमाण वाढवणे, हेदेखील यामागचे मुख्य कारण आहे. पूर्वी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जात नव्हते. परंतु या योजनेत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत मुलींचे खाते उघडल्यावर एक निश्चित रक्कम जमा केली जाते. दर महिन्याला १००० रुपये किंवा वर्षाला १२००० रुपये जमा करु शकतात. मुलगी १४ वर्षाची झाल्यावर मुवीच्या खात्यात १६८००० रुपये जमा केले जातील. दरम्यान, मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला ६,०७,१२८ रुपये दिले जातात. मुलगी हे पैसे तिला हवे असल्यास काढू शकते किंवा उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वापरु शकते.
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुली घेऊ शकतात. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असायला हवे. मुलींच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते असणे गरजेचे आहे.तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेत खाते उघडू शकतात.