
मुंबई प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर राज्याचे वातावरण तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या प्रकरणावरुनमस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर राज्याचे वातावरण तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या प्रकरणावरुन विरोधकांनी धारेवर धरलं आहे. सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दमानिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर येऊन नामदेव शास्त्री भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंडे यांची पाठराखण करीत मुंडे यांचे नाव या प्रकरणात घेऊन राजकारण केले जाते असल्याचे म्हटलं होते.
देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत, हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो, असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानावर सर्वत्र टीका झाली. त्यानंतर देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे,वैभवी देशमुख यांनी नामदेव शास्त्री सानपांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भूमिका बदलली. माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटलं. त्यावर दमानिया यांनी “नामदेव शास्त्री यांच्या कुठल्या विधानाचा विपर्यास झाला असा सवाल केला.
देशमुख कुटुंबियाना न्याय मिळण्यासाठी मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा दिल्यानं वाईट वाटलं, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
एक सूचक ट्विट
हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल असे दमानिया यांनी म्हटले. मंगळवारी सकाळी 11 वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा दमानियांनी व्यक्त केली आहे. या पुराव्यांवर आपण मागील 4 दिवस काम केले असल्याचेही त्यांनी सोशल मीडिया ‘x’ वर सांगितले आहे.
देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्री यांच्यात रविवारी सुमारे अर्धा तास चर्चा झाली. सर्व आरोपींवर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे आहेत याची कुंडलीच धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्याकडे पुराव्यानिशी मांडली.
‘तुम्ही एक बाजू ऐकून बोलला आहात तर आता दुसरी बाजूही तुम्हाला समजावी यासाठीच आम्ही इथे आलो असून आम्हाला न्याय द्या,” अशी मागणी देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने केली.
भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो या प्रकरणातील आरोपींना आम्ही माफ करणार नाही. देशमुख कुटुंबियांच्या मागे भगवानगड सदैव राहील, असा शब्द नामदेव शास्त्री यांनी दिला आहे.