
पुणे प्रतिनिधी
विदयार्थ्यांना एम पी एस सी परिक्षपुर्वी पेपर देतो असे कॉल करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी या प्रकरणाचे गंभीर दखल घेऊन तात्काळ माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले. आदेशानंतर अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर व मा . पोलीस उपआयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनानुसार चार गुन्हे शाखेकडील पथकाने याबाबत तातडीने हालचाली करून कारवाई केली.
याप्रकरणी दिपक दयाराम गायधने जि . पुणे . मुळगाव तामसवाडी , ता . तुमसर जि . भंडारा , सुमित कैलास २३ वर्षे . पुगे , मुळगाव मु . पो . बेडेगाव ता . नांदगाव , जि . नाशिक पाना हा एक बार डी . सी . चाकण सा . हवेली जिल्हा पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांनी अशा प्रकारचे फोन कॉल केल्याचे कबुल केले . अधिक चौकशी केली असता त्यांना योग सुरेद्र वाघमारे रा . सोनाली ता राठी , जि . भंडारा याने नाशिक येथील २४ उमेदवारांची यादी दिली होती त्या यादीमधील नांदगाव जि . नाशिक येथील दोन विद्यार्थ्यांना फोन केल्याची माहिती उघडीस आली.
या अनुषंगाने पोलीस स्टेशन पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव डॉ . सुषणा खरात यांचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि नं ३ ९ / २०२५ भारतीय न्याय सहिता २०२३ ३१८ ( ४ ) ३५३ ( १ ) घर सह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मागास प्रतिबंध ) अधिनियम २०१४ में कलम ३ . ( १५ ) , ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.