
सातारा:प्रतिनिधी
सातारा शहरात आणि परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांचे शटर तोडून ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही दिवसापासून सातारा शहरातील ठिकठिकाणी दुकान फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना सातारा शहर पोलिसात वेगवेगळे ठिकाणी 17 गुन्हे दाखल होते पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली त्याच्याकडून दोन मोबाईल आणि चार हजार रुपये पुण्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी संतोष रामचंद्र गावडे 37 याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर,
उपविभागीय अधिकारी राजीव नवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण शाखेचे स पो नि. शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे पोलीस हवालदार यादव, सुनील मोहिते सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलानी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने प्रशांत कदम तुषार भोसले, सुहास कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.