
सातारा:प्रतिनिधी
पानांची कागदपत्र गाडीसोबत ठेवणे डोकेदुखी झाली असताना सरकारने अंकांसाठी अगदी सोपी ट्रिक तयार केली आहे त्याची पडताळणीत डिजीलॉकरमधील सॉफ्ट कॉपीसंदर्भात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने धोरण लागू केले आहे. त्यामुळे ट्रॅफिक टाळण्यासाठी सरकारने सर्वसामान्यांना डिजीलॉकर अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .
कार किंवा बाईकची फिजिकल डॉक्युमेंट्स सोबत बाळगण्याची आता गरज नाही. वाहन मालक डिजीलॉकर अॅपच्या मदतीने कागदपत्रे दाखवू शकतो, जो पूर्णपणे वैध आहेत. सातारा जिल्ह्यात आजच्या डिजिटलच्या जमान्यात डीजी लॉकर वापरणाऱ्यांची संख्या देखील आहे. सुशिक्षित व उच्च पदस्थ नोकरीतील व्यक्ती आणि खास करून महाविद्यालयीन युवक देखील अशा प्रकारच्या डीजी लॉकर्स चा वप्त करतात.
1 सप्टेंबरपासून मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड आकारण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गदारोळ होत आहे. वाहनचालकांनी वाहन चालवण्यासह संबंधित कागदपत्रे बाळगली नसल्याबद्दल दिलेली मोठी सबब परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र, ते फक्त ‘विसरले’. पण आता ते डिजीलॉकर किंवा mParivahan ॲपमध्ये साठवलेले आवश्यक कागदपत्रे दाखवू शकतात.
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नियमात बदल
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2021 पासून कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री यांनी मोटार वाहन नियम 1989 संबंधित संशोधन केल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यापासून ते डॉक्युमेंट्स बाळगण्यापर्यंतच्या काही नियमात बदलाव केले आहेत.
एमपरिवहन अॅपमध्ये
वाहन मालकाचे नाव, नोंदणीची तारीख, मॉडेल क्रमांक, विम्याची वैधता, आदी सर्व माहिती असते. या अॅप्सचा वापर करून कोणत्याही प्रासाशिवाय वाहतूक पोलिसांना आवश्यक कागदपत्रे दाखवून दंड टाळू शकेल.
सॉफ्ट कॉपीसंदर्भातील नियम काय बघा?
आयटी अॅक्टनुसार ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा अशा कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती दाखवणे बंधनकारक नाही. डिजीलॉकर आणि एमपरिवहन अॅपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध मानली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने सर्व परिवहन विभाग, वाहतूक पोलिसांना यासंदर्भात सूचनाही दिल्या आहेत.
डिजिटल लॉकर मधील कागदपत्रे नाकारल्यास?
कागदपत्रे नाकारल्यास संबंधित वाहनधारक वाहतूक शाखेकडे तक्रार दाखल करू शकतो. त्यातूनही निरसन झाले नसल्यास परिवहनच्या पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतो.
गाडी चालकांसाठी उपयुक्त सोय
या फीचरचा लाभ घेण्यासाठी स्मार्टफोनमध्ये डिजीलॉकर आणि एमपरिवहन अॅप डाऊनलोड करावे लागते. अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी आपला मोबाइल नंबर टाकून ओटीपी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड सेट करून अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर आधार क्रमांक डिजीलॉकर अॅपमध्ये लिंक करावा लागेल. ओटीपीद्वारे त्याची पडताळणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), विम्याची डिजिटल प्रत डिजीलॉकरवरून डाऊनलोड करता येऊ शकते.
भारत सरकारने लोकांची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजीलॉकर अॅप बनवले आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे. हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्ही कागदपत्रे वर्षानुवर्षे सेव्ह करून सहजपणे एका ठिकाणी ठेवू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सतत तुमच्याजवळ ठेवण्याची गरज नाही.