सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असून रविवारी शहरातील विविध प्रभागांतून इच्छुक उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी अपक्ष उमेदवारांचा लक्षणीय प्रतिसाद नोंदवला गेला.
रविवारी दाखल झालेल्या अर्जांची झलक पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्षपदासाठी अर्ज
• काटे सनी – अपक्ष
• अभिजित आवाडे बिचुकले – अपक्ष
नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय अर्ज
प्रभाग 2 : लक्ष्मी राठोड – अपक्ष
प्रभाग 4 : निशांत पाटील – अपक्ष, धुमाळ विकास – अपक्ष
प्रभाग 5 : आंबेकर स्वाती – अपक्ष
प्रभाग 6 : बोराटे पूजा – अपक्ष, किर्तन रविराज – अपक्ष, विजय शेळके – अपक्ष
प्रभाग 7 : कुराडे सुजाता – अपक्ष, धबधबे संगीता – अपक्ष, घाडगे धीरज – अपक्ष
प्रभाग 8 : योगिता गालफाडे
प्रभाग 11 : सावंत प्रणव
प्रभाग 13 : गौड रुपेश
प्रभाग 14 : पालकर तौफिक – अपक्ष
प्रभाग 15 : शेख आयशा – अपक्ष, आंबेकर स्वाती – अपक्ष
प्रभाग 17 : नलवडे बाळासाहेब – अपक्ष, कांबळे मेघा – अपक्ष
प्रभाग 19 : प्रसन्न अवसरे – अपक्ष
प्रभाग 21 : पंडित किशोर – अपक्ष
प्रभाग 22 : इमडे गौरव – अपक्ष, इंदुरकर संतोष – अपक्ष
प्रभाग 24 : नलावडे राहुल – अपक्ष
सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने उद्या महापालिका कार्यालयात अर्जदारांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक इच्छुक उद्या आपली उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून पक्षीय व अपक्ष दोन्ही गटांचे राजकीय तळ उत्साहात कार्यरत झाले आहेत. शहरातील राजकीय घडामोडींना आता आणखी वेग मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


