
सातारा-प्रतिनिधी
(सातारा शहर डी. बी. पथकाची कारवाई – दि.१९/१२/२०२४ रोजी रात्रीचे वेळेत शाहूनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमधील एका बंद घराचा दरवाजा तोडून चोरटयाने घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, जुन्या काळातील पितळेची भांडी, चिल्लरचा डबा वगैरे वस्तूंची चोरी केलेली होती.
सदर झालेल्या चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणन्या बाबत पोलीस अधिक्षक , समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. श्री. सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी तांत्रिक गोष्टीचे आधारे एका संशयितास ताब्यात घेतले होते.
सदर संशयिताकडे सदर गुन्हयाबाबत तपास करित असताना त्याने सदरची घरफोडी केली असल्याचे सांगितले. तसेच सदरचा चोरीचा ऐवज त्याने लपवून ठेवला होता. तो पोलीसांनी हस्तगत केला आहे. त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केले असलेबाबत पोलीसांना शंका आल्याने त्यास अधिक चौकशी केली असता त्याने डिसेंबर सन २०२३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे शाहूनगर येथील तारांगण या ऑफिसमध्ये देखील रात्रीचे वेळेत दरवाजा तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून लाकडी कपाटाचे दरवाजे तोडले होते.
परंतू सदर ऑफिसमध्ये मौल्यवान वस्तू त्यास मिळून आलेल्या नव्हत्या. त्याबाबत देखील सातारा शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता. सदर आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून सदर आरोपीस मा. कोर्टाने ३ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. श्री. सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. किशोर जाधव, निलेश यादव, सुजीत भोसले, शंकर निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.