
सातारा प्रतिनिधी
सातारा|जिल्हा रुग्णालय, सातारा येथे येत्या पंधरा दिवसांत डे केअर किमोथेरपी युनिट कार्यान्वित होणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना जिल्हा स्तरावरच उपचाराची सुविधा मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सुविधेसाठी कॅन्सरवरील उपचार सुरू असलेल्या रुग्णांनी आपली संबंधित कागदपत्रे घेऊन रुग्णालयातील असंसर्गजन्य आजार विभाग (एनसीडी विभाग) क्रमांक १७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
अधिक माहितीसाठी डॉ. प्रमा गांधी (मो. ९९७५८६५७६०) व डॉ. अरुंधती कदम (मो. ९४०३३४७९९५) यांच्याशी संपर्क साधता येईल.