
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | आग्रीपाडा पोलीस ठाणे हद्दीत ११ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुझुकी कंपनीची काळ्या रंगाची बर्गमॅन मोटारसायकल (क्रमांक MH01DW 4778) चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आरोपी मोहम्मद शाद मोहम्मद शफी कुरेशी (वय १९) यास १६ जुलै रोजी नागपाडा येथून, तर मोहम्मद अकबर मुनीर खान (वय २४) यास १७ जुलै रोजी बदलापूर येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली बर्गमॅन मोटारसायकल हस्तगत केली आहे.
तपासादरम्यान या आरोपींचा अन्य मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आग्रीपाडा, नागपाडा, माहिम आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांतील एकूण पाच गुन्ह्यांमध्ये हे दोघेही आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.