
मुंबई प्रतिनिधी
लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्याच्या वादानंतर एका प्रवाशाने एका महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून सदर व्हिडिओच्या तपास करून महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
केवळ जागेच्या वादामुळे अंबरनाथ लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला बेदम मारहाण झाली. एक माणूस सार्वजनिक ठिकाणी महिलेला इतक्या क्रुरपणे बेदम मारहाण करत असेल तर हे प्रचंड गंभीर आहे. pic.twitter.com/LP1qAEDfaP
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) May 20, 2025
तर या प्रकरणात ठाणे जीआरपी आणि आरपीएफकडून तपास सुरू असल्याची सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला प्रवासीसोबत एक पुरुष प्रवासी वाद घालत असल्याचं दिसत आहे. हा पुरुष प्रवासी आपल्या कुटुंबासोबत असल्याचं दिसत आहे. या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पुरुष प्रवाशांकडून महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली.
काही लोकांकडून मध्यस्थी केली जात होती. मात्र मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आवरणं कठीण जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळचा असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी सांगितलं, हा व्हिडिओ काही ग्रुपवर शेअर करण्यात आला होता. त्यामुळे आरपीएफ आणि जीआरपीला हा व्हिडिओ पाठवून या संदर्भातली माहिती घेतली. हा व्हिडिओ सीएसटी- अंबरनाथ लोकलमधील आहे.