
सातारा प्रतिनिधि| दि.२५ अक्टोबर २०२४ |फलटण | महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शरद पवार पक्षा कडून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन दीपक चव्हाण हे आज शुक्रवार दि.२५/१०/२०२४रोजी विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुरस्कृत राजे गटाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी ठीक १ वाजता फलटण येथील श्रीराम मंदिर येथून शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून म्हणजेच सन २००९ पासून दीपक चव्हाण हे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात दीपक चव्हाण हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.
आज फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा दीपक चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून राजे गटाच्या वतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.