
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील पाटणमध्ये एक धक्कादायक घडली आहे. डोंगरला लागलेल्या आगीमध्ये एका जणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. डोंगराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत होते . मात्र या आगीत 64 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अंब्रुळकरवाडी (भोसगांव) तालुका पाटण इथं शुक्रवारी दुपारी डोंगराला आग लागली होती. या आगीत तुकाराम सिताराम सावंत (वय 64) असं मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाल्मिक पठारावरील जौंजाळवाडी ता. पाटण या गावच्या हद्दीत चिरका नावाच्या शिवारात ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. उन्हाळ्याच्या तडाख्याने आग भडकून तिने रौद्ररूप धारण केलं.
आंब्याची बाग वाचवण्यासाठी धावले…
वाऱ्याच्या झोक्याने आग अंब्रूळकरवाडीच्या शिवारात घुसली. याच गावच्या हद्दीतील पठारावर असलेल्या पड्यालचा पट्टा नावाच्या शिवारात मयत तुकाराम सावंत यांची आंब्याची बाग होती. त्या बागेच्या जवळ आग आल्याचे समजताच तुकाराम सावंत यांनी तातडीने बागेकडे धाव घेतली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. उन्हाचा तडाखा असल्याने बघता बघता आगीने चारी बाजूंनी तुकाराम सावंत यांच्या बागेला वेढा दिला. आग विजविण्याच्या नादात आगीने वेढा दिलेला त्यांच्या लक्षात आला नाही.
शेजारीच आग विझवण्यासाठी आलेल्या अशोक पांडुरंग सावंत आणि त्यांच्या पत्नी सुनंदा अशोक सावंत यांनी हाका मारुन त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ऐकू आले नाही, आग इतकी भयंकर होती की, संपूर्ण शिवार आगीच्या भक्षस्थानी पडला. यामध्ये तुकाराम सावंत यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
तुकाराम सावंत यांचा एकुलता एक मुलगा राजस्थान इथं लष्करी सेवेत नोकरी करीत आहे. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्याला अश्रू अनावर झाले आणि तातडीने तो गावाकडे यायला निघाला आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं. आगीची बातमी समजताच ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनी डॉ. प्रविण दाईंगडे यांनी घटनास्थळाला भेट दीली रात्री उशीरापर्यंत घडल्या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.