सातारा प्रतिनिधी
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले 25 मोबाईल अंदाजे किंमत 4,76,000/- किमतीचे वेगवेगळ्या ठिकाणी हस्तक करून नागरिकांना सुपूर्द केले आहेत.
सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून व सीईआई आर पोर्टलवरून तांत्रिक माहिती प्राप्त करून गहाळ झालेले मोबाईलचे तात्काळ शोध घेऊन सातारा कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, जिल्ह्यातून एकूण 25 मोबाईल पोलिसांनी हस्तक करून नागरिकांना परत केल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील, कॉन्स्टेबल मयूर थोरात राजकुमार कोळी, प्रशांत पवार, सायबर पोलीस ठाण्याचे महेश पवार, परिश्रम घेऊन ही कारवाई करून 25 मोबाईल हस्तगत करून संबंधित नागरिकांना सुपूर्द केले, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


