
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईत भयानक घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कामोठे येथे खासगी रुग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉयने अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
रुग्णालयातील घटनेने खळबळ उडाली आहे. कामोठेमधील बी अँड जे खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील धक्कादायक प्रकारानंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कामोठ्यामध्ये खासगी रग्णालयात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉयने अल्पवीयन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाच्या नातेवाईकावरच वॉर्डबॉयनेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कामोठेमधील बी अँड जे या खासगी रुग्णालयातील संतापजनक प्रकारने खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन तरुणी वॉर्डरुममध्ये झोपेत असताना रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. कामोठे पोलीस ठाण्यात वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. स्थानिकांकडून वॉर्डबॉयवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.