
पत्रकार:उमेश गायगवळे
2012 पासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अँटॉप हिल पोलीसानी अटक केली आहे..
आरोपी कुप्पन मरी अप्पण देवेंद्र (36) त्याच्यावर भादवी कलम 307′ खुनाचा प्रयत्न 452 बळजबरीने घरात घुसणे), 324,323 जखमी करणे),तसेच 143 144 146 147 148 149 बेकायदेशीर जमाव)आणि शस्त्र कायदा 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 37 ,(1) 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर आरोपी गेल्या अनेक वर्षापासून फरार होता त्याच्यावर आटख वॉरंट जाहीर करण्यात आले होते.
अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर व अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक 30, यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिल्या होत्या
यानुसार पोलीस उपयुक्त रागसुदा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरफात सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गोरख सानप, पोलीस हवालदार शिवाजी दहिफळे आणि महिला पोलीस हवलदार काजल सकपाळ यांनी तपास सुरू केला. त्याचबरोबर गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील टीमने योग्य रीतीने तपास करून आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवलेआहे.