
पुणे प्रतिनिधी
सन २००६-०७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 18 वर्षांनी श्री सिद्धेश्वर विद्यालय, पिंपळगाव याठिकाणी गेल्या रविवारी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.
प्रार्थना म्हणत परिपाठ घेण्यात आला, त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी त्यावेळेसचे वर्गशिक्षक विठ्ठल सोडनवर यांनी घेतली.
या कार्यक्रमावेळी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अठरा वर्षांनी विद्यार्थी एकमेकांना भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उत्तम जावळे होते. यावेळी इतर शिक्षक व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वर्गशिक्षक विठ्ठल सोडणवर म्हणाले की, हा आमच्यासाठी सुखद धक्का आहे. विशेष म्हणजे उपस्थितामधील आमचे विद्यार्थी हे मोठ्या पदावर गेले आहेत. तसेच त्यांना अनेक दिवसांनी एकत्र पाहिल्याने आनंद झाला. सर्वांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे.
याप्रसंगी 45 माजी विद्यार्थी हजर होते. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्ह्यावा, असे मनोगतामध्ये अनेकांनी इच्छा व्यक्त केली. तसेच शाळेचे दिवंगत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी प्रस्ताविक सचिन थोरात यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय सस्ते, तर कार्यक्रमाचे नियोजन अमित थोरात, गणेश नातु, सागर कदम, अमर माने, विजय शेलार, निलेश दिघे, गणेश दोरगे, शुभांगी पवार यांनी केले. गणेश नातु यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले.