
ठाणे प्रतिनिधी
ठाणे शहर गुन्हे शाखेच्या टीमने भिवंडी तालुक्यातील मोठा साठा जप्त केला त्या पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार होळी गावाजवळ सापळा रचून दिलीप हरिराम पाल 28, ज्योतीप्रकाश हृदय नारायण सिंग 37 दिनेश सिंग चेतन नारायण सिंग 45, आणि श्याम रविशंकर मिश्रा 24 यांना 480 बाटल्यासह रंगेहात पकडले या कारवाईत वाहतुकीसाठी वापरलेली एक मारुती व्हॅन देखील जप्त करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता चेंबूर मधील कुंभारवाडा येथे त्यांचा साथीदार इकबाल साजन शेख 40 याला अटक केली तिथे 17, 160 बेकायदेशीर रित्या साठवलेल्या आढळून आल्या एकूण पोलिसांनी सुमारे 31 लाख 75 हजार रुपयांचा कोडीन सिरपच्या 17,640 बाटल्या आणि बारा लाख किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला आहे. या पाचही आरोपीवर नारपोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा आणि ड्रस अँड कॉस्मेटिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त अमरसिंग जाधव, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस करत आहेत.