
पुणे प्रतिनिधी
काही दिवसापासून इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता आढळून आलेल्या चोरीच्या सुमारे 2 लाख 28 हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी महादेव उर्फ बापु प्रल्हाद चितळकर यास इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड म्हणाले,
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हयाचे प्रमाण वाढले असल्याने सदर मोटारसायकलचे गुन्हे उघड करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्यानुरूप अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण,यांच्या पथकाकडून इंदापुर पोलीस स्टेशन हददीत गस्त करीत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार तुषार चव्हाण यांना आरोपी नामे महादेव उर्फ बापु प्रल्हाद चितळकर (वय 29 वर्ष रा. वरकुटे बु.चितळकरवाडी ता इंदापुर) हा संशयीत रित्या मो सा वरुन फिरताना आढळून आला त्याला ताब्यात घेतला व त्याचेकडे एक नंबर नसलेली काळे रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल मिळून आली.
सदर मोटारसायकलचे तांत्रीक माहीतीच्या आधारे व नाकाबंदी अॅपवरुन माहीती घेतली असता सदर मोटारसायकल ही चोरीची असल्याचे समजले त्यावेळी त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही त्याने स्वतः व त्याचा मित्र अनिल दिलीप लवटे (रा.मेडद लवटे वस्ती ता माळशिरस जि सोलापुर) यांनी मिळून चोरी केली असल्याची कबुली दिली. यातील अटक आरोपी महादेव याने त्याचा मित्र फरार आरोपी अनिल दिलीप लवटे याने आणखी सात ते आठ मोटार सायकली चोरल्या असुन त्या त्याने गावातील ओळखिच्या लोकांना विकल्या आहेत.
त्यापैकी इतर 7 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपी अनिल दिलीप लवटे याचेकडून अजुन काही चोरीच्या मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे. त्यानुरूप पुढील तपास पोलीस निरीक्षक निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांचे पथक करीत आहे.