
पुणे(विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २१ जानेवारी २०२५)–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वैद्यकीय) मदत कक्षाच्या स्थापनेला १ वर्ष पूर्ण झाली. एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील संबंध जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यास वैद्यकीय कक्ष यशस्वी ठरला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेश अध्यक्षा तथा महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वैद्यकीय) मदत कक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. जितेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना एक वर्षांपूर्वी करण्यात आली असून या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील ग्राम स्तरापर्यंत अत्यंत गोरगरीब रुग्णांपर्यंत पर्यंत माहिती पोहचून आणि रुग्णांना मदत मिळवून देण्यास कक्ष यशस्वी ठरला आहे. नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या कक्षाची कामाचे कौतुक करण्यात आले .
रुग्णांना मदती व्यतिरिक्त, कक्षाच्या माध्यमातून विविध स्तरावर आरोग्य, रक्तदान अवयवदान शिबिरे राबवण्यात आल्याने याचा फायदा अनेक गरजू रुग्णाला झाला. हे अत्यंत आनंदाने नमूद करावेसे वाटते असे अजित पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जितेंद्र सातव यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत मिळवून देण्यात आली. तसेच २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या.१४०० पेक्षा जास्त सदस्य जोडण्याचे काम करण्यात आले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय, मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून दाखल रुग्णांचे बिल कमी करणे, अल्पदरात रुग्णसेवा, अत्यंत महाग औषध कमी दरात मिळवून देणे, रुग्णवाहिका, मृत्यू दाखला मिळण्यासाठी सहकार्य करणे, विविध योजनांची माहिती जनसामान्य पर्यंत पोहोचविणे यासारखे असंख्य उपक्रम राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत जिल्ह्यातील नियुक्त पदाधिकाऱ्यांची कामे वाखाणण्याजोगी सरस ठरली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ प वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.