मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार संजीवन शामराव ढेरे (वय ६५) यांचे प्रदीर्घ आजारमुळे शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्वर्गीय संजीवन ढेरे यांच्या स्मरणार्थ जलदान विधी व सार्वजनिक शोकसभा रविवारी दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम पूर्वीच्या पत्त्यावर बच्चूवाला बिल्डिंग, रूम नंबर १० समोरील कंपाउंड (मैदान) ढोलकर लेन, विब ब्रेड कंपनीजवळ, डाँकयार्ड रोड, हार्बर रेल्वे स्टेशन माजगाव, मुंबई – ४०००१० येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी माधुरी संजीवन ढेरे, कन्या हर्षदा संजीवन ढेरे, पुत्र प्रितेश संजीवन ढेरे तसेच ढेरे कुटुंबीय असा परिवार आहे.
ढेरे कुटुंबीयांनी मित्रपरिवार, नातेवाईक व परिचितांना जलदान विधी व शोकसभेस उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
(संपर्क : ८१०८०९१४६२)


