
पुण:प्रतिनिधी
पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी सकाळी १० वा, बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. हायवेवर एका शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच घबराट उडाली.
त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसने अचानक पेट घेतल्याने वाहतूक ठप्प झाली. आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांची जीव वाचले
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला तळेगाव टोलनाक्याजवळ भीषण आग लागली. पुण्याहून मुंबईला जाताना शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या शिवशाही बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाच्या प्रसंगावधाने १२ जणांचे जीव वाचले. चालकाच्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने बस बाजूला घेतली, 12 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बस चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.