
पुणे:प्रतिनिधी
एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. पुणे- सांगली ही रेल्वे सेवा १८ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत बंद असणार आहे
तर ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे.
दक्षिण- पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलरॉक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षा कारणास्तव प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरज मार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
१८ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे – सांगली मार्गे बंद असणार असून, ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा १८ जानेवारी ते १२ एप्रिल आणि बेळगावकडून पुण्याकडे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस २० जानेवारीपासून १४ एप्रिल पर्यंत बंद असणार आहे. यासंदर्भातील माहिती मिरज रेल्वे कृती समितीकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे आता सातारा, सांगली आणि मिरज कोल्हापूरमधून केरळला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. जर आपण एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसचा वापर करून प्रवास करणार असाल तर, दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनाचा वापर करून प्रवास करा, कारण दोन महिन्यांसाठी रेल्वे सेवा पुणे- सांगली मार्गे बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.