
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे -पुण्यात वाकडेवाडी येथील एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं मराठीत बोलले तर कामावरून काढून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या शहाबाद अहमदचा मनसेने समाचार घेतला.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात हिंदी मराठी भाषावाद पेटताना दिसून येत आहे. ठाण्यात मुंब्रा येथील एक मराठी तरुण आणि फळ विक्रेत्याच्या वादाची घटना ताजी असतानाच आता पुण्यात वाकडेवाडी येथे एअरटेलच शोरूम असून या ठिकाणी ही घटना घडली. येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहाबाज अहमद नावाच्या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली.
येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे याबाबत तक्रार केली होती. हिंदू सणांना सुट्टी न देणे तसेच मागच्या तीन महिन्यापासून आमचा पगार देखील दिला नाही, अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे केली होती. इतकंच नाही तर, कोणत्याही सेनेला घेऊन या, कामावरून काढून टाकतो. बघतोच आता कोण येतोय ! असंही शाहबाज बोलत होता अहमदनगर एअरटेल शोरूम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं.
पुढे येतील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे याबाबत तक्रार केली. यानंतर मनसे ने आक्रमक भूमिका घेतली. येत्या सोमवार पर्यंत पगार करा, अन्यथा एकाच वेळी एका दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा इशाराच मनसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिलाय.