
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
मुंबई प्रतिनिधी राज्य सरकारने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरच ठेवले असताना गुरुवारी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हा अधिकारी पदी नियुक्त करण्यात आली आहे तर सातारा जिल्हाधिकारी पदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असून सातारा जिल्हाधिकारी पदी संतोष पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी हे पदभार स्वीकारणार आहे.