पुणे- विभागीय प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २८)—-ज्येष्ठ पत्रकार डॉ किरण ठाकूर यांचा पुण्यातील पत्रकार भवन आणि पत्रकार प्रतिष्ठानच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते.. डॉ. किरण ठाकूर वय (७७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या आठवड्यापासून डॉ. ठाकूर आजारी होते. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. ठाकूर यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
डॉ. ठाकूर यांनी तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता केली. युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्त संस्थेचे प्रतिनिधी आणि पुणे डेलीमध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्व्रर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकांलिकासाठी त्यांनी काम केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले २००१ ते २००७ या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. भारतीय विद्याभवनाच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामे त्यांनी काही काळ केले. आपल्या लेखणीतून समाजातील दीन दुबळ्यांच्या शोषितांचा आवाज बुलंद करत डॉ ठाकूर यांनी समाज हितासाठी पत्रकारिता केली. आणि मरणानंतर ही समाजाचे उपयोगी यावं म्हणून त्यांनी देहदानाच निर्णय घेतला होता. त्यामुळे सम्माच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा सच्चा पत्रकार हरपला अशी प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातून केली जात आहे.


