
सातारा प्रतिनिधी
सातारा, दि. ७ – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व जलदगती गोलंदाज कपिलदेव निखंज यांची विमान प्रवासादरम्यान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले आणि श्री. छ. दमयंतीराजे भोसले यांच्यासोबत खास भेट झाली.
या भेटीत क्रिकेट, इतिहास आणि महाराष्ट्रातील क्रिकेट विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान, १९८३ साली झिम्बाब्वेविरुद्ध कपिलदेव यांनी केलेली अविस्मरणीय नाबाद १७५ धावांची खेळी आठवून घेतली गेली.
यासोबतच मराठा साम्राज्याची ऐतिहासिक राजधानी सातारा आणि राज्यातील क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी नवीन उपक्रम राबविण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. कपिलदेव निखंज यांनी यासंदर्भात लवकरच विशेष बैठक आयोजित केल्यास त्यात योगदान देण्याचे आश्वासन दिले.