
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाचे स्वागत मोठ्यागणेशोत्सवात मुंबईत वाहतुकीत बदल जल्लोषात होत आहे. दरवर्षीप्रमाणेच रस्त्यांवर भाविकांची गर्दी वाढली असून, त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तात्पुरते बदल जाहीर केले आहेत.
कुठे निर्बंध?
चेंबूर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, मानखुर्द, मुलुंड, साकीनाका, एमआयडीसी, कांदिवली, गोरेगाव, सांताक्रूझ, डीएन नगर व सहार परिसरात वाहनांच्या हालचालींवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले आहेत.
हेमू कलानी मार्ग, गिडवानी मार्ग, घाटला व्हिलेज रोड, डॉ. सीजी मार्ग, सायन,पनवेल महामार्ग, एलबीएस मार्ग, जेव्हीएलआर मार्ग आणि मध,मार्वे मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
नो–पार्किंग व रस्तेबंदी
देवडे रस्ता, जुहू तारा रस्ता आणि ओशिवरा नाल्याजवळील रस्ते मिरवणुकीदरम्यान पूर्णपणे बंद राहतील. अनेक भाग नो–पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
रेल्वे ओव्हरब्रिजवरील नियम
ओव्हरब्रिजवर कोणत्याही क्षणी १०० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल. मिरवणुका, थांबे, नृत्य व लाऊडस्पीकर वापरण्यास सक्त मनाई आहे.
वाहतूक संथ
मुंबईतील अनेक रस्त्यांवर आज सकाळपासूनच गर्दी दिसून आली. छोटा सायन येथे खाजगी बस बिघडल्यामुळे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे ट्रॅफिक पोलिसांनी कळवले.