
पुणे प्रतिनिधी
शहर पोलिस दलातील १२ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पाच पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता.२१) काढला.
पोलिस निरीक्षकाचे नाव, सध्याचे ठिकाण आणि कंसात नव्याने नेमणूक झालेले ठिकाण :
संतोष पांढरे- गुन्हे शाखा (वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे), विठ्ठल पवार- उत्तमनगर पोलिस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे), यशवंत निकम- सायबर पोलिस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट), उत्तम भजनावळे- सिंहगड रस्ता (वरिष्ठ निरीक्षक, चतु:शृंगी), विक्रमसिंह कदम- कोथरूड (वरिष्ठ निरीक्षक, खडकी), दिलीप फुलपगारे- खडकी पोलिस ठाणे (वाहतूक शाखा), विजयमाला पवार- विश्रामबाग (वाहतूक शाखा), राहुल गौड- सहकारनगर (वाहतूक शाखा), युवराज नांद्रे- स्वारगेट (वाहतूक शाखा), उल्हास कदम- चतु:शृंगी (पोलिस निरीक्षक गुन्हे, सिंहगड रस्ता), जितेंद्र कदम- भारती विद्यापीठ (गुन्हे, विश्रामबाग), दत्ताराम बागवे- गुन्हे, खडकी (गुन्हे, विश्रांतवाडी).