
मुंबई प्रतिनिधी
मुंबई |‘छावा युवा संघटना महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्ष फत्तेसिंगराजे उर्फ बाबासाहेब भोसले पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आज प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे औपचारिक स्वागत केले.
या वेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर बाबासाहेब भोसले पाटील यांनी, “शिवसेनेच्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवून जनतेच्या हितासाठी काम करणार आहोत,” असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी नव्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत, “या संघटनेच्या सहभागीमुळे पक्ष अधिक मजबूत होईल,” असा विश्वास व्यक्त केला.