
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
सातारा:महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये अल्पवयीन बालकांना भिक मागणे, अवयवांची तस्करी, तसेच बालकांची तस्करी (विशेषतः मुली) वेश्याव्यवसायाकरिता अपहरण करुन विकले जाते. याबाबत अनेक प्रकार होत असताना त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस घटकांमध्ये अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU), सातारा हे समीर शेख. पोलीस अधीक्षक, सातारा, . डॉ. वैशाली कडुकर, अपर पो. अधीक्षक, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
सातारा तालुका तसेच सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक तथाकथित रिलस्टार
असलेली महिला तिच्या पुरुष साथीदारांच्या मदतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जाहिरात करुन
तसेच इन्स्टाग्राम वर असलेल्या फॉलोव्हर्स चा उपयोग हा वेश्याव्यवसायासाठी गिऱ्हाईक मिळवुन त्यांना पुरुष साथीदारांच्या मदतीने मुली पुरवीत आसल्याबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. तसेच एका स्थानिक न्युज चॅनेल ने एक शरीरविक्रय करणारी महिला व ग्राहक यांची कॉल रिकॉर्डिंग प्रसारित केली होती. नमुद प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवुन.समीर शेख. पोलीस अधीक्षक, सातारा, यांनी . अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना नमुद मुलीचा प्राधान्याने शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी.सुधीर पाटील सपोनि, श्वेता पाटील पो. उप निरीक्षक यांचे अधिपत्याखाली अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU), सातारा यांचे पथक तयार केले व गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या आदेशानुसार खिंडवाडी परिसरात सापळा रचुन १ महिला आरोपी, ३ पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतले तसेच २ पिडीत महिलांची सुटका करणेत आली आहे.सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक तांबे, सपोनि मोरडे, नेवसे तसेच स्टाफ यांनी सहभाग घेतला.