Higher Education Archives - Satara Pratinidhi

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी; शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू
विटा : प्रदीप जोशी

मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळतो आहे की नाही, याचा नियमित आढावाही विभागाकडून घेतला जात आहे.

परीक्षा शुल्कमाफीचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, जनसंपर्क अधिकारी किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

विद्यापीठनिहाय संपर्क क्रमांक

मुंबई विद्यापीठ, मुंबई : डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), अजय ठुबे (७५८८१६९१३४).

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), डॉ. काळवणे (७०२०६३४५०२).

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड : डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१).

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), महाले (९८२३१९२८३१).

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ : डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५).

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९).

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई : संजय नेरकर (९९२२४४४४६७), डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९).

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक : डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).

The post दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी; शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू appeared first on Satara Pratinidhi.

आयआयटी मुंबईत आरक्षित प्रवर्गांना प्रतिनिधित्वाचा अभाव? ४१२ प्राध्यापकांमध्ये SC केवळ ५, OBC ६; ST एकही नाही
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : आयआयटी मुंबईतील प्राध्यापक भरतीमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष भरती मोहीम राबवूनही या प्रवर्गांतील प्राध्यापकांची संख्या अत्यल्प असल्याची माहिती अधिकारातून (RTI) समोर आली आहे. सप्टेंबर २०२६मधील आकडेवारीनुसार, आयआयटी मुंबईतील ४१२ प्राध्यापकांमध्ये SC प्रवर्गातील केवळ पाच, OBC प्रवर्गातील सहा, तर ST प्रवर्गातील एकही प्राध्यापक नसल्याची माहिती समोर आली आहे.

सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांवरील ३६३ प्राध्यापकांमध्ये SC प्रवर्गातील २९, ST प्रवर्गातील आठ आणि OBC प्रवर्गातील ३५ प्राध्यापक कार्यरत आहेत. दरम्यान, आयआयटी मुंबईतील मंजूर अध्यापन पदांची संख्या १,२२५ असून, त्यापैकी तब्बल ४५० पदे रिक्त असल्याचेही RTIमधून समोर आले आहे.

SC प्राध्यापकांची संख्या केवळ एकाने वाढली

ही माहिती ऑल इंडिया OBC स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष गौड किरण कुमार यांनी दाखल केलेल्या RTI अर्जातून मिळाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मिळालेल्या RTI उत्तरानुसार, तिन्ही स्तरांवर SC प्रवर्गातील ३३, ST प्रवर्गातील आठ आणि OBC प्रवर्गातील ४१ प्राध्यापक कार्यरत होते. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार SC प्रवर्गातील प्राध्यापकांची संख्या केवळ एका पदाने वाढल्याचा दावा कुमार यांनी केला आहे.

या आकडेवारीच्या आधारे कुमार यांनी प्राध्यापक भरतीतील आरक्षित प्रवर्गांच्या प्रतिनिधित्वावर प्रश्न उपस्थित केला आहे. आरक्षित प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व कमी राहिल्यास या समुदायांतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना संस्थात्मक पातळीवर पुरेसे प्रतिनिधित्व मिळते का, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.

आरक्षित प्रवर्गांच्या प्रतिनिधित्वावर प्रश्न

आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी अल्युमनी सपोर्ट ग्रुपचे सदस्य धीरज सिंह यांनीही या आकडेवारीच्या आधारे आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांमध्ये आरक्षित प्रवर्गांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचे म्हटले आहे. मात्र, केवळ प्राध्यापकांच्या सामाजिक प्रवर्गाची आकडेवारी पाहून कोणत्याही विशिष्ट प्राध्यापकाने जातीय भेदभाव केला, असा निष्कर्ष काढता येत नाही, हेही या संदर्भात महत्त्वाचे आहे.

२०२३मध्ये ५२३ SC अर्जदार; निवड मात्र चार जणांची

यापूर्वीच्या RTI माहितीनुसार, २०२३मध्ये आयआयटी मुंबईतील प्राध्यापक पदांसाठी SC प्रवर्गातून सुमारे ५२३ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी केवळ चार उमेदवारांची निवड झाली. याच वर्षी ST आणि OBC प्रवर्गातून एकाही उमेदवाराची निवड झाली नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

२०२४मध्ये SC प्रवर्गातील ४४ अर्जदारांपैकी दोन, ST प्रवर्गातील २२ अर्जदारांपैकी एक आणि OBC प्रवर्गातील १०६ अर्जदारांपैकी तीन उमेदवारांची निवड झाली होती. त्यामुळे अर्जदारांची संख्या आणि अंतिम निवड यामधील अंतरही चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष भरती मोहिमेनंतरही स्थितीत फारसा बदल नाही?

२०२३मध्ये आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी यांच्या मृत्यूनंतर आयआयटींमधील SC, ST आणि OBC प्राध्यापकांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने आयआयटींना SC आणि ST प्रवर्गातील प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, सप्टेंबर २०२६मधील उपलब्ध आकडेवारीनुसार आयआयटी मुंबईतील ४१२ प्राध्यापकांमध्ये SC प्रवर्गातील पाच, OBC प्रवर्गातील सहा आणि ST प्रवर्गातील एकही प्राध्यापक नसल्याने विशेष भरती मोहिमेचा अपेक्षित परिणाम कितपत झाला, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. त्यातच १,२२५ मंजूर अध्यापन पदांपैकी ४५० पदे रिक्त असल्याने भरती प्रक्रिया आणि आरक्षित प्रवर्गांचे प्रतिनिधित्व या दोन्ही मुद्द्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.

The post आयआयटी मुंबईत आरक्षित प्रवर्गांना प्रतिनिधित्वाचा अभाव? ४१२ प्राध्यापकांमध्ये SC केवळ ५, OBC ६; ST एकही नाही appeared first on Satara Pratinidhi.

इंजिनीअरिंग-फार्मसी प्रवेशात बारावीच्या गुणांनाही महत्त्व; तज्ज्ञ समिती स्थापन
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत आता बारावीच्या गुणांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी केवळ ‘एमएचटी-सीईटी’च्या पर्सेंटाईलवर अवलंबून न राहता बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणांना महत्त्व देण्याच्या दृष्टीने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.

या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १७ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला आहे. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धत निश्चित करण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.

सीईटीच्या निकालावरून निर्माण झाले प्रश्न

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान बारावीमध्ये तुलनेने कमी गुण मिळवलेल्या काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाईल मिळाल्याचे प्रकरण समोर आले होते. काही विद्यार्थ्यांनी थेट ९९ पर्सेंटाईलपर्यंत मजल मारल्याने सीईटीच्या परीक्षा पद्धतीबाबत तसेच निकाल प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

या पार्श्वभूमीवर पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून प्रवेश प्रक्रियेचा फेरविचार करण्याची मागणी होत होती. त्यानंतर सरकारने बारावीचे गुण प्रवेश प्रक्रियेत कशा पद्धतीने समाविष्ट करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.

गुणवत्ता यादीसाठी नवे धोरण ठरणार

एमएचटी-सीईटीचा पर्सेंटाईल आणि बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांचा विचार करून अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी कशी तयार करावी, याबाबत समिती शिफारसी करणार आहे. या दोन्ही परीक्षांतील गुणांना किती प्रमाणात महत्त्व द्यायचे, याचे धोरण समिती निश्चित करणार आहे.

समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू तसेच उच्च शिक्षण संचालक हे समितीचे सदस्य असतील. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

समितीला आपला अहवाल १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करायचा आहे. या अहवालानंतर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि एमएचटी-सीईटीचा पर्सेंटाईल यांचा समावेश असलेली प्रवेशपद्धती निश्चित होण्याची शक्यता आहे.

The post इंजिनीअरिंग-फार्मसी प्रवेशात बारावीच्या गुणांनाही महत्त्व; तज्ज्ञ समिती स्थापन appeared first on Satara Pratinidhi.