मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात प्रशासकीय फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर ११ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आले.
गृहविभागाच्या वतीने अवर सचिव संदीप गोरखनाथ ढाकणे यांनी हे आदेश काढले असून, यामध्ये १० अधिकाऱ्यांची बदली मुंबईत तर एका अधिकाऱ्याची मुंबईहून बाहेर करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे विविध प्रशिक्षण केंद्रे, महामार्ग सुरक्षा पथक, गुन्हे शाखा तसेच पोलीस मुख्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना मुंबईतील विविध विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
मुंबईत बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे:
संजय दामोदर डहाके – खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक
महेश नारायण मुगुटराव – नाशिक गुन्हे शाखा प्रशिक्षण केंद्र
अविनाश प्रल्हाद पालवे – पुणे महामार्ग सुरक्षा पथक
ज्योत्स्ना विलास रासम – रायगड महामार्ग सुरक्षा पथक
कल्पना यशवंत गाडेकर – ठाणे महामार्ग सुरक्षा पथक
सूर्यकांत गणपत बांगर – छत्रपती संभाजीनगर-मनमाड लोहमार्ग उपविभाग
मृत्युंजय धानय्या हिरेमठ – कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय)
रेणुका शंभुराज बुवा (होनप) – नाशिक परिक्षेत्र, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील वाचक
शशिकांत शंकर माने – नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, कोकण भवन
सुहास पांडुरंग कांबळे – नाशिक, महाराष्ट्र पोलीस अकादमी
मुंबईहून नाशिकला बदली झालेला अधिकारी:
मनोज बाबूराव खंडाळे – सध्या मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत; त्यांची बदली नाशिकमधील गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
या बदल्यांद्वारे मुंबई पोलीस दलात नवचैतन्य निर्माण होईल, तसेच विविध क्षेत्रांमध्ये अनुभव लाभलेल्या अधिकाऱ्यांमुळे कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


