
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय २०२० साली सुरू झाल्या पासून ४ वर्षात आयुक्तालयातील एकही पोलीस स्टेशन मध्ये महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हवत्या.मेघना बुरांडे पहिल्या महिला वरिष्ठ निरीक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयचे उदघाटन केले गेले . पहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांच्यावर टाकलेला विश्वास दाते यांनी देखील बऱ्याच अंशी सार्थ ठरवत नव्या आयुक्तालयाची झपाट्याने घडी बसवली . त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदासाठी कोणतीही महिला अधिकारी नसली तरी आता पर्यंत उपायुक्त , सहायक आयुक्त पदी महिला अधिकारी यांनी काम केले आहे .
आयुक्तालयात सध्या १९ पोलीस ठाणी आहेत . परंतु पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी आता पर्यंत एकही महिला अधिकारीची नियुक्ती झाली नव्हती . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून मुंबईतून आलेल्या मेघना बुरांडे यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे .
बुरांडे यांचे वडील सांगलीच्या पलूसचे तर आई कोकणातील पेंडूर कट्टा येथील . दोघेही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत . घरात कोणीही पोलीस खात्यात नसले तरी वडिलांची इच्छा असल्याने खेळाडू असलेल्या मेघना यांनी पोलीस खात्यात भरती व्हायची जिद्द दाखवत २००५ साली त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या . त्यांनी सहायक निरीक्षक असताना मनोर , नाटे व मांडवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे
त्यांनी आता पर्यंत रायगड , रत्नागिरी , ठाणे ग्रामीण , ठाणे शहर व मुंबई हद्दीत काम केले आहे . अनेक गुन्ह्यांची उकल करतानाच स्पष्ट व परखड शिस्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जातात . गुन्हेगारीला आळा घालण्यासह नागरिकांशी संवाद साधणे , समाजात पोलिसां बद्दलचा विश्वास अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला असल्याचे सांगितले जाते . मेघना यांना डीजी इन्सिग्निया अर्थात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक देउन गौविण्यात आले आहे.