सातारा प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील इंदीरानगर दि मार्च 2025 रोजी दुपारी 12.30 दरम्यान आरोपी सतिश भाऊसो काळे व रोहीत शिवाजी डेंगरे या दोघांनी. इंदीरानगर लोणंद येथे राहणाऱ्या किरण किसन गोवेकर याला लाकडी दांडक्याने डोक्यात,चाकुने छातीत वार करु खुन केला होता. सतिश काळे व रोहीत डेंगरे हे फरारी झाले होते.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी अवघ्या तासाभरात आरोपीला लोणंद येथून अटक केली.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, बी. वाय. बालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई चार्ज फलटण,यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि विशाल कदम, मपोउनि ज्योती चव्हाण, पोउनि शिवाजी घुले, सपोफौ देवेंद्र पाडवी, पोहवा चंद्रकांत काकडे, नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठठल काळे, सुनिल नामदास, सचिन कोळेकर, सतीष दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर विकास कोकरे, यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.


