
सातारा प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील सुळेवाडी येथील हनुमंत देवबा शेजवळ यांच्या विहिरीवरील पाण्याची मोटर सुमारे किंमत 18000 चोरीस गेली होती. मोटर चोरीची तक्रार अधिक ज्ञानदेव पाटील यांनी पोलिसात केली होती त्यानुसार पोलिसांनी काही तांत्रिक माहितीच्या आधारे चौकशी करून आरोपी सुदर्शन सुरेश लोहार 21 वर्षे याला अटक केली आहे त्याच्याकडून लाडा लक्ष्मी कंपनीची थ्री एचपी पाण्याची इलेक्ट्रॉनिक मोटर जप्त केली आहे. सदरची कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि, चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुनिता शेळके, पाटील, पगडे, पवार यांनी ही कारवाई केली.