
सातारा प्रतिनिधी
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला.
साताऱ्याच्या पोवई नाका येथे रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांनी फटाक्याच्या आतिषबाजी तर राजवाडा परिसरात प्रीतम कळसकर मित्र समूहाने उदयनराजेंच्या उपस्थितीत आठ फुटी केक कापून मोठ्या स्वरूपात कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि उदयनराजेंचे चाहते उपस्थित होते. जमावातील एक कार्यकर्त्याने उदयनराजेंना I Love You महाराज साहेब म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
उदयनराजे भोसले यांचं जन्म 24 फेब्रुवारी 1966 असून ते आता 59 वर्षांचे झाले आहेत
राजवाडा जवळच्या गांधी मैदानावर प्रीतम कळसकर मित्र समूहाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आठ फुटी केक कापण्यात आला. हा केक कापण्यासाठी आवर्जून खासदार उदयनराजे भोसले हे गांधी मैदानावर आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवा वर्ग या मैदानावर पाहायला मिळाला.
पुण्यातील उदयनराजेंच्या चाहत्याने दिले चांदीचं सिंहासन भेट…
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे पुण्यातल्या शिवाजीनगर येथून आलेल्या रामभाऊ देवकर मित्र परिवाराच्या वतीने चांदी आणि सोन्याचे सिंहासन भेट देण्यात आले आणि वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पुण्याहून जलमंदिर पॅलेस या ठिकाणी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.