
उमेश गायगावळे
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहती मधील मा. उच्च न्यायालयास हस्तांतरित करावयाच्या एकूण ३०.१६ एकर जागेचा टप्पा टप्प्याने हस्तांतर करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने गौतम समता सेवा संघ, गौतम नगर वांद्रे पूर्व येथील बुद्ध विहार, निवासी, व अनिवासी सदनिका धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मालाड येथील अप्पा पाडा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याने तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून.
आमचे स्थलांतर वांद्रे पूर्व येथेच करण्यात यावे असा आग्रह रहिवाशांनी केला. आम्ही गेल्या ४० ते ५० वर्षापासून येथे राहत असल्याने आमची मुलं येथीलच शाळेत असल्याने तसेच घरकाम करणाऱ्या महिला, पुरुष येथेच काम करत असल्याने आम्हाला वांद्रे पूर्व येथेच पुनर्वसन करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला असल्याचे रहिवाशांनी सांगितले.