
यवतमाळ प्रतिनिधी
पुसद जवळच असलेल्या काेपरा फाटा येथे दाेन जण दाेन खाेके भरून तलवारी घेऊन येणार असल्याची माहिती शहर पाेलिस ठाण्याच्या डीबी पथकालामिळाली हाेती. त्यानुसार पथकाने मंगळवार, 4 फेब्रुवारीला तलवारीचा साठा बाळगणाऱ्या दाेघांना अटक केली.
काेपराफा फाटा राजननगर येथे राहणारे शेख अकबर शेख बाबर (31) व वाजीद नवाब सलीमाेद्दीन नवाब (35) असे अटक केलेल्या युवकांची नावे आहेत.शेख अकबर व वाजीद नवाब हे दाेघेजण काेपरा फाटा येथे दाेन खाेके भरून तलवारी विक्रीकरिता आणत असल्याची माहिती हाेती. त्या आधारे दाेघांनाही ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 20 हजार रुपये किंमतीच्या 10 तलवारी आढळून आल्या आहेत. हा धारदार तलवारींचा साठा सापडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.