सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भुमिपुजन समारंभ दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक समीर शेख आणि जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. सातारा करंजे येथे म्हसवे रोडला सैनिकांच्या वसतीगृहाशेजारी या इमारतीसाठी १ हेक्टर २१ आर एवढी जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त झालेली आहे. होमगार्डचे प्रशिक्षण केंद्राची इमारत महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामडंळ यांचे मार्फत बांधण्यात येणार आहे.
या इमारतीमध्ये 50 होमगार्ड निवासी प्रशिक्षण् घेवु शकतील. भेाजनगृह, व्याख्यानगृह, भांडार कार्यालय,शस्त्रागार,इ. अद्यावत सुविधा होमगार्डना उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी होमगार्ड जिल्हा समादेशक श्रीकांत शेटे, भोजराज घाटगे, नितीनकुमार शेंडे तसेच जिल्हयातील होमगार्डचे माजी अधिकारी, होमगार्ड पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित हेाते.


