मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना, शिवसेना (ठाकरे गट) कडून रविवारी रात्री उशिरापर्यंत निर्णायक हालचाली घडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची घोषणा झाल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मचे वाटप केले. यामुळे मुंबईच्या राजकारणात निवडणुकीची धग आणखी वाढली आहे.
रविवारी रात्रीपासूनच ‘मातोश्री’वर उमेदवारी निश्चित झालेल्या इच्छुकांना फोन करून बोलावण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रत्येक उमेदवाराची भेट घेत, स्वहस्ते एबी फॉर्म दिले. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे ‘मातोश्री’ परिसरात उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक प्रभागांतील उमेदवारांची नावे अखेरच्या क्षणी निश्चित झाल्याने वातावरणात उत्सुकता आणि तणाव दोन्ही दिसून आला.
मनसेसोबतच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ठाकरे गटाने पहिल्या यादीत तब्बल ६० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या उमेदवारांकडून आजच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित काही प्रभागांतील उमेदवारांना सोमवारी एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी
१) वॉर्ड क्रमांक १ – फोरम परमार
२) वॉर्ड क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) वॉर्ड क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) वॉर्ड क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
५) वॉर्ड क्रमांक १६ – स्वाती बोरकर
६) वॉर्ड क्रमांक २५ – माधुरी भोईर
७) वॉर्ड क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
८) वॉर्ड क्रमांक २९ – सचिन पाटील
९) वॉर्ड क्रमांक ४० – सुहास वाडकर
१०) वॉर्ड क्रमांक ४९ – संगीता सुतार
११) वॉर्ड क्रमांक ५४ – अंकित प्रभू
१२) वॉर्ड क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१३) वॉर्ड क्रमांक ५९ – शैलेश फणसे
१४) वॉर्ड क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
१५) वॉर्ड क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१६) वॉर्ड क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
१७) वॉर्ड क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१८) वॉर्ड क्रमांक ६४ – सबा हारून खान
१९) वॉर्ड क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
२०) वॉर्ड क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
२१) वॉर्ड क्रमांक ८९ – गितेश राऊत
२२) वॉर्ड क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
२३) वॉर्ड क्रमांक ९५ – हरी शास्त्री
२४) वॉर्ड क्रमांक १०० – साधना वरस्कर
२५) वॉर्ड क्रमांक १०५ – अर्चना चौरे
२६) वॉर्ड क्रमांक १११ – दीपक सावंत
२७) वॉर्ड क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२८) वॉर्ड क्रमांक ११८ – सुनीता जाधव
२९) वॉर्ड क्रमांक १२० – विश्वास शिंदे
३०) वॉर्ड क्रमांक १२३ – सुनील मोरे
३१) वॉर्ड क्रमांक १२४ – सकीना शेख
३२) वॉर्ड क्रमांक १२५ – सतीश पवार
३३) वॉर्ड क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
३४) वॉर्ड क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
३५) वॉर्ड क्रमांक १३० – आनंद कोठावदे
३६) वॉर्ड क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
३७) वॉर्ड क्रमांक १३४ – सकीना बानू
३८) वॉर्ड क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
३९) वॉर्ड क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
४०) वॉर्ड क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
४१) वॉर्ड क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
४२) वॉर्ड क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
४३) वॉर्ड क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
४४) वॉर्ड क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
४५) वॉर्ड क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
४६) वॉर्ड क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
४७) वॉर्ड क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
४८) वॉर्ड क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
४९) वॉर्ड क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
५०) वॉर्ड क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
५१) वॉर्ड क्रमांक २०६ – सचिन पडवळ
५२) वॉर्ड क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
५३) वॉर्ड क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
५४) वॉर्ड क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
५५) वॉर्ड क्रमांक २१५ – किरण बालसराफ
५६) वॉर्ड क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
५७) वॉर्ड क्रमांक २२० – संपदा मयेकर
५८) वॉर्ड क्रमांक २२२ – संपत ठाकूर
५९) वॉर्ड क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
६०) वॉर्ड क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
काल रात्री उशिरा ‘मातोश्री’वर अनेकांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना आज एबी फॉर्म वाटले जाणार असल्याची माहिती आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर उमेदवार जाहीर केले जात आहेत. एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांकडून आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.


