
सातारा प्रतिनिधी
सातारा : राजधानी सातारा येथील छत्रपती शाहू कला मंदिरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे बांधकाम मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानदादा वैराट, सुनिल काटकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने यांच्यासह साहित्यिक, विविध मान्यवर, पदाधिकारी आणि हजारो सातारकर कार्यक्रमाला उपस्थित होते.
साहित्यविश्वातील योगदान आणि मराठी भाषा-संस्कृती संवर्धनासाठी सुरू असलेल्या कार्याचा या प्रसंगी विशेष गौरव करण्यात आला.