
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोड मध्ये ३१ जानेवारी २०२४ च्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क सातारा, रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील विविध हॉटेल ढाबा यांच्यावर विशेष कार्यवाहीची मोहीम सुरू करण्यात आले आहे.
चिंचाळकर विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली. रविंद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली दारु पिण्याची बेकायदेशीररित्या व्यवस्था करणा-या हॉटेल व ढाबा तसेच खानावळी यांच्यावर कारवाईची विशेष मोहिम सुरु दिनांक २८/१२/२०२४ हॉटेल स्वाद, सैदापूर ता.जि. सातारा या हॉटेलवर अचानक छापे टाकून कारवाई करण्यात आली हॉटेल मालक यांच्यावर हॉटेलच्या जागेत परमिटरुम बिअरबार परवाना नसताना देखील बेकायदेशीर दारु पिण्याची व्यवस्था केल्याबद्दल महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १९४९ मधील नियम ६८(अ)(ब) नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी दारु पिण्यासाठी उपस्थित असणारे दोन इसमानवर देखील कारवाई करण्यात आली आहे.जिल्हयातील हॉटेल व्यावसायिक यांना आवाहन करण्यात येते की, दि. ३१ डिसेंबर रोजी नुतन वर्षे मोठया उत्साहाने साजरा केले जातात. जिल्हयातील पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्यटकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित असतात अशावेळी कार्याक्रमामध्ये ब-याच वेळा जिल्हयातील हॉटेल व्यवसायिक मद्य वितरणाकरिता एकदिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती (Temporary One Day Function License) FL-IV मंजूर करुन न घेता कार्यक्रमाच्या दिवशी विविध प्रकारचे विदेशी मद्य, बिअर व वाईन हॉटेल परिसरात वितरण, साठा तसेच मद्य पिण्याची व्यवस्था केल्याचे तपासणी वेळी यापुर्वी निर्दशनास आलेले आहे तरी हॉटेल मालक, चालक हॉटेल व्यवस्थापन किंवा हॉटेल मधील पर्यटक यांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा नुसार कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल सदर गुन्हयात ३ ते ५ वर्षाचा तुरुंगवास किंवा २५,००० ते ५०,००० रुपये पर्यंत द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद आहे याची नोंद घ्यावी असे निर्देश श्री. रविंद्र आवळे,अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.