
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाकडुन परजिल्हयांत वेशांतर करुन गोपणीय बातमीदार नेमुन तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन पुरावे गोळा करुन उत्कृष्ठ तपास कौशल्यातुन सन २०२२-२०२३ मधील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रशासनाची फसवणुक करणाऱ्या दिड वर्षापासुन पाहिजे असलेल्या आरोपीस अटक
सातारा पोलीस भरती सन २०२१ चे अनुशंगाने नोव्हेंबर २०२२ पासुन राबविणेत आलेल्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराने संमातर आरक्षण मिळवुन भरती होणेसाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करुन पोलीस भरतीचा लाभ घेण्याकरीता पोलीस प्रशासनाची फसवणुक केली होती. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा व पोलीस भरती संदर्भाने असलेने गुन्हयाचा सखोल तपास होणेकामी मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्याअनुशंगाने श्री. सुनिल फुलारी पोलीस महानिरिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयातील बनावट प्रकल्पग्रस्त दाखले उमेदवारांना पुरविणाऱ्या आरोपींची पाळेमुळे शोधुन काढणेकामी प्रभावी तपास करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि सुधीर पाटील यांचेकडे गुन्हयाचा तपास देवुन त्यांचे अधिनस्थ पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तपासी अंमलदार सपोनि सुधीर पाटील यांचे पथकाने पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात बनावट प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करुन प्रशासनाची फसवणुक करुन फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापुर्वी अहमदनगर जिल्हयात जावुन गोपणीय बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त करुन शिताफीने अटक केलेले होते. त्याचेकडे सखोल तपास केलेनंतर त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखला पुरविणारा इसम हा बीड जिल्हयातील असलेचे समजुन आले. त्याने सातारा जिल्हयाप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्हयात झालेल्या पोलीस भरतीमध्ये देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुरविलेले होते. त्यामुळे त्याचेविरुध्द गुन्हे दाखल होवुन महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील पोलीस पथकेदेखील त्याचा शोध घेणेकामी मागावर होते. त्याचा गुन्हयांत सहभाग असलेचे निष्पण्ण झालेचे त्यास समजलेपासुन तो फरार झालेला होता. तो त्याचा ठावठिकाणा कोणालाही समजून देत नव्हता. त्याच्यावर महाराष्ट्रात सातारा, अलिबाग, पुणे, गडचिरोली, यवतमाळ, याठिकाणी १० गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने वेळोवेळी बीड- अहमदनगर जिल्हयात जावुन वेषांतरे करुन गोपणीय बातमीदार नेमुन माहिती प्राप्त करुन त्यातुन पुरावे गोळा करुन उपलब्ध झालेल्या तांत्रिक माहितींचे योग्य प्रकारे विश्लेषण करुन तसेच त्याचेशी कागदोपत्री तपासांची योग्य प्रकारे सांगड घालुन सातारा व महाराष्ट्रात इतर जिल्हयांत सन २०२२-२०२३ साली झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेकरीता उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविणाऱ्या आरोपीस शोधुन काढुन त्यास दिनांक १६/१२/२०२४ रोजी अटक केलेली आहे. त्याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे याचे मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणाऱ्या अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे याने पुरविले होते असे त्याने सांगितले. सदरचा अंशकालीन कर्मचारी सन २०२१ मध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मयत झालेला असुन त्याने तत्कालीन कालावधीत त्यास ज्ञात असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करुन बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविलेले होते. असे तपासामध्ये निषण्ण झालेले असुन त्याअनुशंगाने तपास पथकाकडुन गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.