
सातारा प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या *‘वोट चोरी’*च्या मुद्द्याला प्रतिसाद देत साताऱ्यात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. ‘लोकशाही वाचवा’ या निर्धारासाठी घेतलेल्या या उपक्रमात सातारा शहर व परिसरातील महिलांचा मोठा सहभाग होता.
पोवई नाका परिसरात दुपारी झालेल्या या अभियानात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राहुल गांधी यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. स्वाक्षरी करून महिलांनी लोकशाही, न्याय आणि संविधान रक्षणासाठी संघर्ष करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या वेळी कार्यकर्त्यांनी महिलांना एकत्र येण्याचे आवाहन करत लोकशाहीविरोधी कारवायांना ठामपणे विरोध करण्याची गरज अधोरेखित केली.
या आंदोलनात सुषमा राजे घोरपडे, प्राची ताकतोडे, अनिता जाधव, अनिता भोसले, शोभा गोळे, धनश्री मालुसरे, हजारा शिकलगार, वैशाली कदम, अर्चना पाटील, शारदा कांबळे, पवित्रा पवार, शीतल कदम व मेघा बेंद्रे आदी कार्यकर्त्या सहभागी झाल्या.