
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई |घाटकोपर पूर्व भागात भरदिवस झालेल्या खून प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. जिशान रफिक शेख (वय २२) या युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली असून, त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादीसोबत कारने प्रवास करत असताना जिशान शेख याचा घाटकोपरच्या दक्षिण वाहीनी सर्व्हिस रोडवर दुचाकीस्वाराशी किरकोळ वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने चाकूने जिशानच्या छातीत वार करत त्याचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेनंतर पंतनगर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. विविध कक्षांच्या पथकांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यास पुढील कारवाईसाठी पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.
तपास कार्यात पुढील अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले –
प्र.पो.नि. आत्माजी सावंत (कक्ष-७), दीपक सावंत (कक्ष-१०), भरत घोणे (कक्ष-६), सचिन गवस (कक्ष-१२),
पो.नि. काकडे (कक्ष-११), सुतार (कक्ष-८), बाळगी, राऊत
स.पो.नि. तोडकर, साठे, सरवदे, लंबाते, यादव, शेख, रासकर, सांडभोर, प्रजापती, पाटील, चिकणे,पो.उ.नि. काळे, शेलार, परबळकर, शिंदे, सावंत, मोरे, रहाणे, बेळणेकर,म.पो.उ.नि. माशेरे
गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे परिसरात भीतीचं वातावरण कमी झाल्याचं नागरिकांनी सांगितलं असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.