
कल्याणमधील बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (२६ नोव्हेंबर २०२४) संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
कल्याणमधील वायले नगरमधील व्हर्टेक्स सोसायटीतील १६ व्या मजल्यावर ही आग लागली. संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्यासाठी रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत