
मुंबई प्रतिनिधी
आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी कारवाई करत मेट्रो येते जात असतानी बसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला iPhone हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी संजय कुमार हे आपल्या कुटुंबासोबत चर्चगेटकडे जाण्यासाठी भुलेश्वर स्टँडहून मेट्रो दिशेने निघाले होते. वातानुकूलित बस क्रमांक 6362 मध्ये प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या iPhone मोबाईलचा वापर करून तो उजव्या खिशात ठेवला. मात्र मेट्रो बस स्टॉप येथे उतरल्यावर मोबाईल सापडला नाही. सदर मोबाईलची किंमत अंदाजे ३० हजार रुपये.
फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरु झाला. बसमधील CCTV फुटेजच्या आधारे एका अज्ञात इसमाने मोबाईल चोरतानाचे दृश्य स्पष्टपणे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 02/2025, कलम 302(2) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे 19 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास तपास पथकाने आरोपी हसमत जाकुवा शेख वय 25, याला मेट्रो परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एल.टी. मार्ग, भोईवाडा आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये कलम 379 अंतर्गत आधीच गुन्हे दाखल आहेत. त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या नेतृत्वात सपोनी लीलाधर पाटील, म.पो.उपनिरीक्षक शारदा चोंधे आणि त्यांची टीम – पो.ह. राजेंद्र कटरे, पो.शि. ज्ञानेश्वर मुंडे, सचिन पाटील, गोपीनाथ पाटील व अमर कीर्तीकर यांनी केली.