मुंबई प्रतिनिधी
वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या विशेष कारवाईत मानवी तस्करीच्या गुन्ह्यात अडकलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईतून हुगळी, कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथून महिलेला अटक करण्यात आली आहे.
वडाळा टीटी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली. माहितीप्रमाणे, आरोपी अमरधीर सरदार यांनी दोन अल्पवयीन मुलींना कामाच्या बहाण्याने मुंबईत आणून ६०,००० रुपयांना विकल्याची बाब समोर आली होती. तपासाअंती पोलिसांनी आरोपी अनिल पंड्या आणि आसमा शेख यांना मुंबई येथून अटक केली.
तपासादरम्यान, या प्रकरणात आसमा शेख हिने आशा पवार, हीसह काही मुलींना पश्चिम बंगालमधून आणून मुंबईत विक्री केल्याचे उघड झाले.
तपासात पोलिसांनी हुगळी, पश्चिम बंगाल येथे धाड टाकून दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात आरोपी महिला आशा पवारला पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर पोलीस महासंचालक, मा. संजय सक्सेना विशेष पोलीस महासंचालक, हेमराज राजपूत सह पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
वडाळा टी टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, वडाळा टी टी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


