
वार्ताहर -स्वप्नील गाडे
वांद्रे पूर्व विधानभेतील शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना महायुती कडून उमेदवारी नाकारली.नाराज कुणाल सरमळकर हे त्यांचा बालेकिल्ला वांद्रे पूर्व विधानसभेतून अपक्ष विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची बातमी समोर येत आहे.
वांद्रे पूर्व विधानसभा मधील शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे गेले कित्येक वर्षे वांद्रे पूर्व विभागातील जनतेच्या सेवेची कामे करत आहेत.वांद्रे पूर्व या विभागात बहुतांश भागात बैट्याचाळी आहेत.या चाळींचा विकास कसा होईल या दृष्टीने सरमळकर प्रयत्न करत आहेत.या चाळींन मधील लोकांनसाठी सुलभ सौच्यालय बनवणे व लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्यशिबिराचे आयोजन करणे.तेथील जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने गल्लोगल्ली सी.सी.टीव्ही कॅमेरे लावणे.लोकवस्ती मध्ये सुशोभीकरण करणे असे अनेक लोकहिताची कामे कुणाल सरमळकर करत आहेत.
या विभागात त्यांचा युवानेता म्हणून खूप प्रभाव आहे.लोकांना थेट भेटणारे विभागप्रमुख म्हणून तेंची ओळख आहे.याच कार्यशैली मुळे कुणाल सरमळकर यांचा मतदारवर्ग वांद्रे विधानसभेत अधिक वाढलेला आहे.याच केलेल्या लोकहिताच्या कार्याच्या जोरावर मंगळवार दि- २९/१०/२०२४ रोजी कुणाल सरमळकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.कुणाल सरमळकर हे अपक्ष उमेदवार स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्धीकी व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरून देसाईं या दोन्ही उमेदवारांना पिछाडीवर टाकण्याची चिन्हे वांद्रे विधानसभेत दिसू लागलेली आहेत?